सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे सोलापूर शहरातील मिरवणुकीचे मार्ग तसेच अतिक्रमणच्या विळख्यात सापडलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी दररोज बेधडक कारवाया करत आहेत. मात्र नगरसेवक आणि आमदारांचा वाढता हस्तक्षेप तसेच ज्यांचे अतिक्रमण काढले जात आहे त्यांच्याकडून होणारे आरोप यामुळे आता ही मोहीम गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे याबाबत आता काय ठोस निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.वास्तविक पाहता जगन्नाथ बनसोडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने पुन्हा सेवेत घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाने तसेच शहरातील नगरसेवक आणि आमदारांनी सहकार्य केले नाही तर बनसोडे आता घरचा रस्ता धरण्याच्या तयारीत आहे.
