सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यातील अक्कलकोट जवळ असणाऱ्या मौजे वळसंग या गावी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 एप्रिल 1937 साली वळसंग या गावामधील भिमनगर परिसरातील सर्व समाजबांधवांच्या माध्यमातून बांधलेल्या विहिरीचे उदघाटन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते.
या घटनेला 85 वर्षे पूर्ण होतात अद्याप पर्यंत दुर्लक्ष असलेल्या विहिरीच्या वास्तुला गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पाठपुरवठा करून हा परिसर सुशोभिकरण करण्याचा निर्णय गावातील सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये घेतला. त्यानंतर गटनेते आनंद चंदनशिवे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून र.रु.22.00 लाख एवढी तरतुद तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कलशेट्टी यांच्या निधीतुन र.रु.15.00 लाख असे एकुण र.रु.37.00 लाख एवढी निधीतून कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपुजन करण्याच्या संदर्भात जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांचे यशवंत नगर शासकिय निवासस्थान सोलापूर येथे बैठक दि.29/06/2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता झाली.
या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे हस्ते भूमिपुजन, प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोटचे आमदार श्री.सचिनदादा कलशेट्टी, तसेच जिल्हा परिषद सदस्य सर्व पदाधिकारी, तालुका पंचायत समिती सभापती व सदस्य, वळसंग ग्रामपंचयातीचे सरपंच व सदस्य गावातले सर्व सामाजिक कार्यकर्ते, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपुजन करण्यात येणार आहे असे या बैठकीत ठरले आहे. या बैठकीस जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, गटनेते आनंद चंदनशिवे, विश्रांत गायकवाड, शाखाअभियंता राजेश जगताप, शांतीकुमार गायकवाड, अविनाश भडकुंबे, महेश निकंबे, आदी उपस्थित होते.