सोलापूर, दि. 25- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पूजनाचा शहरात घरोघरी सुरु असून ’बोला …बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नंदीध्वजांचे पूजन सम्राट चौक येथील मसरे टाऊनशिप येथे मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.
ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचे पूजन श्रद्धा व प्रतिक मसरे दाम्पत्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंदीध्वजाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. यावेळी नंदीध्वजांचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. राजशेखर स्वामी यांनी मंत्रोच्चाराचे पठण केले.
यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी अनेक भक्तांची इच्छा असते. सोलापूर शहर परिसरात हे नंदीध्वज पूजनासाठी घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर पंचकमिटीचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे, सुनिल मसरे, अनिल मसरे, सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सोमनाथ भोगडे, सुधीर थोबडे, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, मनीष मसरे, सारंग मसरे यांच्यासह नंदीध्वजधारक व भक्तगण उपस्थित होते.