सोलापूर : कामती खुर्द येथील श्री परमेश्वर आश्रम शाळा लमाण तांडा यांचे चालक अब्दुल जब्बार साहेबलाल शेख यांनी एक बेकायदेशीर समांतर आश्रम शाळा उभी केली वेतनाच्या आभारासाठी या पंचवीस लोकांनी श्री सेवे चैतन्य न्यास आणि व्यासाच्या मान्यताप्राप्त आश्रम शाळेच्या नावाचा वापर केला आणि सन २००० पासून प्रतीवर्षी सरासरी एक कोटी रुपयांच्या वेतन वेतनेतर अनुदान चा अपहार केला आहे. संबंधित दोषी व्यक्तींचा दिवाणी दाव्यातील अर्ज २४ नोव्हेंबर ९७ रोजी न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.