इलिझीयम क्लब्ज आणि जामश्री रिअॅल्टीने एकत्र येऊन सोलापूरमध्ये सुरू केला अव्वल दर्जाचा स्पोर्टिंग, फिटनेस व लाइफस्टाइल क्लब
सोलापूर, फेब्रुवारी ५, २०२४ – अव्वल स्पोर्टिंग, फिटनेस व लाइफस्टाइल क्लब्जच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इलिझीयम क्लबला आपले नवीन व्हेंचर सोलापूरमध्ये सुरू करताना अभिमान वाटत आहे. कंपनीच्या वेगवान वाढीच्या पथातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. जामश्री रिअॅल्टीच्या सहयोगाने इलिझीयम क्लब्जने सोलापुरात अव्वल श्रेणीचा स्पोर्टिंग व लाइफस्टाइल अनुभव देणारा क्लब सुरू केला आहे. या सहयोगामुळे त्यांच्या भागीदारीतील रिअल इस्टेट वसाहतींमधील सदस्यांसाठी क्रीडा, स्वास्थ्य आणि मनोरंजनाची व्याख्याच बदलून जाणार आहे. सोलापुरातील दमानी नगरमध्ये सुरू होणारा हा नवीन क्लब ५ एकरांहून अधिक जागेत परिश्रमपूर्वक विकसित करण्यात आला आहे. त्यामध्ये उच्च श्रेणीच्या सामाजिक तसेच क्रीडाविषयक पायाभूत सुविधा आहेत. ,
जागतिक दर्जाच्या सुविधा (अमेनिटीज) आणि उत्कृष्टतेप्रती अविचल निर्धार असलेली ही आस्थापना स्थानिक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे स्थळ होण्यासाठी सज्ज आहे. सदस्य येथे त्यांचे छंद तसेच आवडीनिवडी यांना अनुसरून दिल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांची अपेक्षा ठेवू शकतात. यामध्ये एक्स्लुजिव कार्यक्रम आणि खास विकसित करण्यात आलेल्या कार्यशाळांपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण व कोचिंग कार्यक्रमांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. क्लबमध्ये पूर्णपणे सुसज्ज अशी व्यायामशाळा (जिम) तज्ज्ञांच्या प्रशिक्षण सुविधेसह उपलब्ध आहे. शिवाय, ग्रुप स्टुडिओ, बॉक्सिंग रिंग, ३ बॅडमिंटन कोर्टस्, ९ क्रिकेट लेन्स, २ फूटबॉल टर्फ, २ टेनिस कोर्टस्, हाफ-ऑलिम्पिक आकारमानाचा तापमान-नियंत्रित पोहण्याचा तलाव, ५००० चौरस फुटांचा स्पोर्टस् बार, एक को-वर्किंग आधुनिक बिझनेस लाउंज आणि ४०,००० चौरस फुटांचे अँफिथिएटर अशा सर्व सुविधा इलिझीयम क्लबमध्ये आहेत. सर्व वयोगटांतील व वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेल्या सदस्यांसाठी हा क्लब एक अद्वितीय पर्यायांची मालिका देऊ करत आहे.
इलिझीयम क्लबचे संस्थापक गुरपवित सिंग म्हणाले, “सोलापुरातील आमचा विस्तार आमच्या वाढीच्या योजनांमधील एक धोरणात्मक पाऊल आहे. पुणे, चेन्नई आणि मुंबईतील आमच्या फ्लॅगशिप क्लब्जना मिळालेल्या भरघोस यशानंतर आम्ही हे पाऊल उचलले आहे. उच्च श्रेणीच्या पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण कार्यक्रम व सेवा यांच्या माध्यमातून क्रीडा, तंदुरुस्ती आणि स्वास्थ्य यांना केंद्रस्थानी ठेवणारे समुदाय निर्माण करण्याचे महत्त्व आम्ही जाणतो. भारतातील जनतेला अधिक निरोगी, आनंदी आणि लवचिक करण्याप्रती असलेली संयुक्त बांधिलकी आणखी वाढवण्यासाठी जामश्री रिअॅल्टीशी सहयोग करणे साहजिकच होते. एकत्रितपणे एक चैतन्यशील परिसंस्था जोपासण्याची आमची इच्छा आहे. ही परिसंस्था जीवनशैली उंचावेल, आरोग्य व स्वास्थ्य यांमधील उत्कृष्टतेची जोपासना करेल आणि सोलापुरात क्रीडासंस्कृती आणखी पुढे नेण्यास चालना देईल.”
जामश्री रिअॅल्टीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमानी यांनी या सहयोगाच्या रूपांतरणात्मक प्रभावावर प्रकाश टाकला: “इलिझीयम क्लब्जसोबत आमचा सहयोग म्हणजे सोलापुरातील क्रीडा व जीवनशैलीविषयक अनुभव उंचावण्याच्या दृष्टीने टाकलेले लक्षणीय पाऊल आहे. समुदायामध्ये स्वास्थ्य, सहकार्य व व्यक्तिगत वाढ यांना चालना देणारे गतीशील वातावरण निर्माण करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. निवासी सदस्यांना क्रियाशील जीवनशैली राखण्याची, आपल्या आवडीनिवडी जोपासण्याची आणि अर्थपूर्ण संबंध जोडण्याची संधी पुरवणे ही आमची सामाईक बांधिलकी आहे.”
या उद्दिष्टाशी संलग्नता राखून, साउथ युनायटेड फूटबॉल क्लब, गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया, पीबीआय टेनिस स्पेशिअॅलिस्ट्स, मायकल फेल्प्स स्विमिंग, बॅडमिंटन प्रोज पॉवर्ड बाय सायना नेहवाल आणि हॅटन अकॅडमीज बॉक्सट्वेल्व्ह यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांशी सहयोग केल्याचा इलिझीयम क्लब्जला अभिमान वाटतो. या भागीदारींमधून इलिझीयम क्लब्जची उत्कृष्टता व नवोन्मेष यांच्याप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होते. त्याचप्रमाणे सदस्यांना वेगवेगळ्या क्रीडाशाखांमधील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण व विकासात्मक कार्यक्रमांचा लाभ मिळेल, याची खात्रीही याद्वारे केली जाते.
सोलापुरात इलिझीयम क्लब्जचे झालेले भव्य उद्घाटन हे कंपनीच्या प्रतिभेला चालना देण्याच्या, महत्त्वाकांक्षा जोपासण्याच्या तसेच क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्टतेची संस्कृती निर्माण करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. इलिझीयम क्लब्ज विषयी:
इलिझीयम क्लब ही एक एण्ड-टू-एण्ड रिअल इस्टेट सेवा कंपनी आहे. जगातील लोकांची बांधणी करून जग सुधारण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे. क्रीडा व तंदुरुस्ती ही अधिक आनंदी व निरोगी समुदाय निर्माण करण्याची साधने आहेत.
गुरपवित सिंग आणि अमित गोयल यांच्या कल्पनेतून ही कंपनी साकार झाली आहे. जीजीसी, एसपीआर ग्रुप, सॉलिटेअर ग्रुप, वाधवा ग्रुप यांसारख्या मोठ्या विकासांना इलिझीयम क्लब अॅमिनिटी स्थळांवर मोठा आरओआय देते. वसाहतीचे असेट व्यवस्थापन हे कंपनीच्या विशेष कौशल्याचे क्षेत्र आहे. २२ हून अधिक आंतरराष्ट्रीय अकॅडमी सहयोगींच्या व ब्रॅण्ड्सच्या सहाय्याने वर्षभरात २०० हून अधिक कार्यक्रम इलिझीयम क्लब्जतर्फे घेतले जातात. भारतात कंपनीचे ४ सक्रिय क्लब्ज सध्या सुरू आहेत आणि १७ क्लब्ज विकासाधीन आहेत.