ईव्हीएमच्या विश्वासहार्यतेवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आगामी बंगळुरू महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मत पत्रिकांद्वारे घेतल्या जातील,अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने हा निर्णय शासनाच्या दबाव खातर घेतला नाही. आयोग एक स्वायत्त संस्था असून आयोगाला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त जी एस संगरेशी यांनी सांगितले.

