येस न्युज मराठी नेटवर्क : जूना प्रभाग क्रमांक 22 पोगुल मळा,रामवाडी येथे “हात से हात जोडो” अभियानाची महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केली होती या कार्यक्रमास मोठ्ठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत राजनंदा गणेश डोंगरे यांनी तर शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचा स्वागत गणेश डोंगरे यांनी केले.
यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाले की, रामवाड़ी व आजु बाजू परिसरातील नागरिक बंधु भगिनींच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी तिसऱ्यांदा आमदार झाले. माझे आणि तुमचे आमदार आणि मतदाराचे नाते नसुन एक आई आणि मुलीचे नाते आहे. निवडणुका असो वा नसो आम्ही कायमच तळागाळातील जनतेचे कोणतेही काम असो करत राहणार, त्यांच्या हितासाठी काम करणार, आत्ता या भागातील पाणी प्रश्ना बाबत गणेश डोंगरे यांनी सांगितले ते ही लवकरच सोडविनार आहे. सोलापुरला आज जे पाणी मिळते ते शिंदे साहेबांनी उजनीची पाईपलाईन आणल्यामुळे पण या नाकर्त्या भाजपमुळे सोलापुर वासियांना पाच ते सहा दिवसाआड़ ते ही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शिंदे साहेबांनीच मंजूर करुन आणलेल्या दुहेरी पाइपलाइन ची एक पाईप सुद्धा भाजपवाल्यांनी टाकली नाही त्यामुळे सोलापुर वासीयांची पाण्यासाठी हाल सुरु आहेत. भाजपावाल्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही, त्यांना फक्त सत्तेशी देणेघेणे आहे सत्ता मिळाली की जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे खिसे आपल्या उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे कामे करतात. काँग्रेस नेते राहुलजी गांधी जनतेचे प्रश्न घेऊन भारत जोडो यात्रा काढली, सोलापुर शहरात हात से हात जोडो अभियानाद्वारे रेशन, पेंशन, दाखले मिळवून देणे, मदतकार्य, महागाई, बेरोजगारी, तसेच जनतेच्या कोणत्याही अडचणी असू दया ते सर्व सोडविनार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाले की, गणेश डोंगरे यांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे. महिलांचा आदर करा, त्यांना सन्मान दया तरच खरे महिला दिन साजरा होईल असेही म्हणाल्या.
या कार्यक्रमास संयोजक गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, देवाभाऊ गायकवाड, अँड केशव इंगळे, अंबादास करगुळे, नागनाथ कदम, भारत जाधव, अनिल मस्के, युवराज जाधव, अनिल जाधव, अंबादास गायकवाड, नागनाथ कासलोलकर, युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, श्रीकांत वाडेकर, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, अँड मयूर खरात, बालाजी जाधव, पवन गायकवाड़, अँड शुभम माने, दाऊद नदाफ, सुमन जाधव, कुणाल गायकवाड, नंदकिशोर चव्हाण, संजय गायकवाड, नागनात शावने, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, राजेन्द्र शिरकुल, दीनानाथ शेळके, सुनील सारंगी, अजिंक्य पाटील, शरद गुमटे, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, सुभाष वाघमारे, अप्पा सलगर, मुमताज तांबोळी, बसंती सालुंखे, चंदा काळे, मुमताज शेख, सुनीता बेरा, वसिष्ठ सोनकांबले, समीर काझी, सत्यनारायण संगा, लालू सानी, श्रीनिवास परकीपंडला, शशिकांत शेळके, मनोहर सालुंखे, मनोहर चकोलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश डोंगरे यांनी, सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, तर आभार चंद्रकांत नाईक यांनी मानले.