येस न्युज मराठी नेटवर्क ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.
माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.