सोलापूर :जुना पुना नाक्याजवळ अवंती नगर येथील राहत्या घरातून अठरा वर्षांची तरुणी 20 मे रोजी दुकानासाठी जाते असे सांगून घरातून कोठेतरी निघून गेल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत पोलीस हवालदार टीव्ही गवळी अधिक तपास करीत आहेत. या तरुणीच्या अंगावर लाल रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा स्कार्फ , ब्लॅक लेगीन आणि पांढर्या रंगाचा मास्क असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिच्याजवळ निळ्या रंगाची सैक असल्याचेही तसेच डाव्या हातावर मेंदी लावलेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.