शरद गोसावी साहेब संचालक प्राथमिक तथा अध्यक्ष राज्य बोर्ड यांच्या यांच्यासोबत तब्बल एक तास आणि माननीय सचिन्द्र प्रतापसिंग आयुक्त शिक्षण यांचे सोबत तब्बल 50 मिनिटे महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना राज्य कार्यकारणीची बहिष्कारा बाबतची चर्चा संपन्न झाली असून आपल्या निवेदनातील प्रत्येक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा अतिशय सकारात्मक झाली. आयुक्त महोदयांनी चर्चेचा सर्व तपशील शिक्षण मंत्री महोदय यांच्याकडे यथाशीघ्र पोचवण्याबाबत आश्वासित केले.
शासनाकडून आपल्या मागण्यांबाबत लवकरच तोडगा निघू शकतो असे एकंदरीत आशादायी वातावरण आहे. जोपर्यंत शासनाकडून आपल्याला चर्चेला बोलावण्यात येत नाही व लिखित किंवा ठोस स्वरूपात मागण्या मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केल्या जात नाही पर्यायाने राज्य संघटना जोपर्यंत आपणास स्पष्ट निर्देश देत नाही तोपर्यंत आपला बहिष्कार कायम राहणार आहे त्यामुळे कोणीही शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा बोर्डाद्वारे आयोजित ऑफलाईन किंवा ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होऊ नये व स्वीकृती पत्र ही भरून देऊ नये. या आठवड्यामध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आपण आपली एकी कायम ठेवूया.