मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती. अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. 23 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांना पोलीस मुख्यालयात बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.