सोलापूर : कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात २५ मे रोजी २१६८ वाहनांची तपासणी करून २,८४,३००० रुपये दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्या ४१७ जणांविरुद्ध कारवाई करून २,०८,५०० रुपये दंड करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ आस्थापनांना २२,८०० रुपये दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने २४८ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ५३,८०० रुपये दंड करण्यात आला . नाका-बंदी दरम्यान ५५ वाहने जप्त करण्यात आली.