सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद , सोलापूर आयोजित पदाधिकारी , अधिकारी व कर्मचारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते करण्यात आले.
हुतात्मा स्मृती सभागृहात सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकपात्री अभिनय , स्टेज गीत , कविता सादरीकरण तासेच विविध गीते व डान्स , लोकनृत्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये जोष भरला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सांस्कृतिक समितीचे प्रमुख तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव , जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , नरेंद्र खराडे , सुनिल कटकधोंड , कृषी अधिकारी वाघमोडे यांचेसह सर्व विभाग प्रमुख तसेच नाट्य परिषदेचे प्रशांत बडवे आदींच्या उपस्थितीत या दमदार कार्यक्रमास सुरूवात झाली आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी केले.
कन्नड व मराठी , हिंदी गितांचा जल्लोष ….!
ओतप्रत भरलेला उत्साह….! गितांच्या ठेक्यावर थिरकणारी पाऊले….! सांस्कृतिक कार्यक्रमात विविध गाण्यांची भरगच्च रेलचेल असून कन्नड गाण्यांनी देखील अनेकांना ठेका धरायला लावला आहे…!
कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्या मै हू डाॅन…..! , जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या आरंभ प्रचंड है व कार्यकारी अधिकारी नरेंद्र खराडे यांच्या मेरी स्वप्नो की राणी या गितावर एकसाथ कर्मचारी व सर्व विभाग प्रमुख यांची पाऊले थिरकली…! सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाने रंगत वाढविली आहे..!
एकपात्री अभिनयाने डोळे पाणावले…!
मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगलेल्या बापाची कथा मोहोळचे प्रदिप गुंड यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून साकारली आणि त्यांच्या धीरगंभीर अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले…!