येस न्युज मराठी नेटवर्क : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु पटोले यांनी ऐनवेळी अध्यक्षपदासोबतच मंत्रीपद देण्याची मागणी केल्याने पक्षाने प्रदेशाध्यक्षाची घोषणा रखडल्याची माहिती आहे.प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद आहे. तसेच ते काँग्रेसचे विधिमंडळ नेते आहेत. त्यांनी स्वत: प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पक्षाचे प्रभारी आणि वरिष्ठ नेत्यांचे मत जाणून घेतल्यानंतर नाना पटोले यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली.