सोलापूर: प्रभाग 26 मधील ज्ञानेश्वर नगर व मुग्धा रेसिडेन्सी येथे हद्दवाढ झाल्यापासून पाण्याची पाईप लाईन नव्हती ही बाब त्या नगरातील नागरिक कोष्टी , माशाळकर मोहन जाधव यांनी प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेच झोन 5 चे जेई म्हेञे यांना समक्ष पाहणी केली. त्याप्रमाणे म्हेञे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून अहवाल हेड ऑफिस कडे पाठवला होता. ही बाब नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिकेतील आयुक्त शितल तेली उगले व मठपती यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने तीथे पाण्याची पाईपलाईन घालून देऊन नळ कनेक्शन जोडून देऊन फुल प्रेशरने पाणी पुरवठा सुरू करून दिल्याने तेथील महिला वर्ग आनंद व्यक्त करण्यात आला.
गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही जुळे सोलापूर मधील ज्ञानेश्वर नगर व मुग्धा रेसिडेन्सी मध्ये राहात आहोत पण कोणीच आमच्या नगराकडे लक्ष देत नाही फक्त निवडणूक पुरते आश्वासन मिळायचे व निवडणूक झाली की परत आमच्याकडे कोणीच फिरकत नव्हते.
परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर केवळ एकाच महिन्यात आमचा पाण्याचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सोडविला अशा जनतेसाठी धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या.