सोलापूर – भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन ऑफ इंडिया भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सरांच्या १० व्या पुण्यतिथीच्या औचित्याने ड्रीम फाऊंडेशन, चाण्यक्य गुरुकुल, डॉ. कलाम कौशल्य विकास पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवार दि. २५ जुलै ते २९ जुलै २०२५ दरम्यान राष्ट्रउभारणी प्रेरणा अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक ड्रीम फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भारताला महासत्ता बनविण्याचे प्रेरणा डॉ. कलाम सरांनी दिली. व भारतीय तरुणाईच्या अंतरमनातील स्वप्नाना अग्निपंख लावण्याचे कार्य डॉ. कलाम सर यांनी केले. त्यांच्या प्रेरणेतुन ड्रीम फाऊंडेशन मागील २० वर्ष विविध सामाजीक उपक्रम राबवित असून डॉ. कलाम 1 पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता जुळे सोलापूरातील मॅक्स अकॅडमी, सभागृह, दावत चौक येथे विद्यार्थी शिक्षक यांना प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एस. एम. हनीफ, डॉ. शशिकांत हिप्परगी यांचे भार्गदर्शन मिळणार आहे. शनिवार दिनांक २६ जुलै रोजी अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशाला येथे सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांना डॉ. कलाम संदेश यावर मार्गदर्शन व स्नेहबंधन अक्कलकोट फार्मास प्रो कंपनी अक्कलकोट येथे चंद्रकांत हक्के यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शक होणार आहे.
रविवार दिनांक २७ जुलै डॉ. कलाम पुण्यतिथी निमित्त सकाळी ११ वाजता द्वारकाधीश मंदिर सभागृह, जलाराम नगर, विजापूर रोड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार मा. डॉ. अशोक नगरकर वरिष्ठ वैज्ञानीक डी. आर. डी. ओ., श्री व्यकंटेश गंभीर वैज्ञानीक. भा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. पोलीस आयुक्त्त एम. राजकुमार, मा. सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड, श्री अजयसींह पवार वित्त नियंत्रक म्हाडा, एम के फाऊंडेशनचे महादेव कोगनुरे यांच्या शुभहस्ते सन्मान होणार आहे. या कार्यक्रमात व्ही. एस अंकुलकोटे पाटील पुणे, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, शरणमठ संकुल अक्कलकोट, प्रमोद तम्मनावार सोलापूर, महारुद्र माडेकर बीड, डॉ. कपील कोरके वैराग, विजय पवार लेखक पुणे, विकास भोईर पुणे, डॉ. शितल गांधी उद्योजक बार्शी, अरुण तळीखेडे माजी सैनिक संघटना, शशिकांत आकडवाडे, इंद्रजीत पाटील रुई, केरबा पाटील कोल्हापूर, प्रा. प्रबुध्दचंद्र झप्के सांगोला, किशोर जाधव सोलापूर यांच्या सह सामाजीक, कृषी, आरोग्य, शिक्षण व प्रशासकीय क्षेत्र कार्यरत मान्यवरांचा सन्मान होणार आहे. या कार्यक्रमात महासत्ता भारत व युवकांची जबाबदारी यावर मान्यवरांचे मार्गदर्शक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता राजमाता जीजाऊ भाकरी केंद्र वर्धापन दिन व ड्रीम फाऊंडेशन स्नेह मेळावा, गुरुशांत भतगुणकी यांचे सहस्रचंद्र दर्शन सोहळा व मातोश्री गजराबाई भतगुणकी यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम सुंदर मल्टीपर्पज हॉल, नेहरु नगर, विजापूर रोड येथे आयोजीत केले आहे.
सोमवार दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री संगमेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल येथे भाविकांना महा प्रसाद वाटप व मंगळवार दि. २९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ड्रीम फाऊंडेशन सभागृह येथे सामाजीक संस्था व सामाजीक कार्यकर्ते यांच्यासाठी एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सचिव संगीता भतगुणकी यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी विश्व रियालटीचे विश्वनाथ सोनटक्के, श्री समर्थ ज्वेलर्सचे संचालक नितीश वेदपाटक, सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र, मॅक्स अकॅडमी, ऑल इस वेल फॅसीलिटीज मॅनेजमेंटचे एम. डी. शिवानंद हत्तुरे, बसवसंगम शेतकरी गट यांचे सहकार्य लाभले असुन विविध शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी ड्रीम आय. ए. एस. सेंटर यांनी पुढाकार घेतला आहे. पत्रकार परिषदेस वैभव सोनटक्के, नितीश वेदपाटक, सचिन धुमकनाळ, सौ. दिपा भुजबळ, सिध्दाराम जोकारे, सतीष पाटील आदी उपस्थित होते.
