सोलापूर : शहरात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या श्री जय भवानी मेडिकल शेजारी डॉक्टर बसवराज सुतार यांच्या हृदय स्पंदन हार्ट केअर चे रविवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक चेतन नरोटे, डॉक्टर बसवराज सुतार, डॉक्टर उमाश्री सुतार, अक्कलकोट मधील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजीवकुमार सिद्रामप्पा पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ भरमशेट्टी, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, अमोल भोसले आदी उपस्थित होते.

प्रारंभी फीत कापून हृदय स्पंदन चे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉक्टर बसवराज सुतार यांनी हृदय स्पंदन या हार्ट केअरची माहिती प्रास्ताविका दिली. खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये या आगळ्यावेगळ्या हार्ट केअर सेंटरचे कौतुक केले. रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.




माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी देखील उपस्थित राहून डॉक्टर बसवराज सुतार यांच्या अनुभवाचे कौतुक केले. त्यांच्या हातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

यावेळी विश्वनाथ भरमशेट्टी, अरुण भरमशेट्टी, अप्पू हाताळे, आप्पाशा भरम शेट्टी, यांच्या हस्ते मान्यवरांची सत्कार करण्यात आले. डॉक्टर बसवराज सुतार हे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर सुपुत्र असल्यामुळे हनूर चपळगाव तसेच अक्कलकोट तालुक्यातील विविध गावातून आणि सोलापूर शहरातून विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास, चपळगाव चे सरपंच सिद्धाराम भंडारकवठे, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, गोटू मंगरुळे, चिनू पाटील, प्राध्यापक निलेश भरमशेट्टी, चंद्रकांत रोटे, गुरुपदाप्पा बिडवे, आकाश भरमशेट्टी, विनोद भोसले, नरेंद्र जंगले, सोपान निकते, सिद्धाराम हेले, नीलपा घोडके, आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे, संगीता हिरवाडकर यांनी केले