लॅप्रोस्कोपी सिस्टीम या अत्याधुनिक यंत्राचा प्रथमच वापर
सोलापूर ; येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात डॉ. संजीव ठाकूर यांनी देशभरातील पहिली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. यामध्ये लॅप्रोस्कोपी सिस्टीम या अत्याधुनिक यंत्राचा प्रथमच वापर करण्यात आला आहे.
डॉ. ठाकूर हे डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विशारद आहेत. वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या अत्याधुनिक साधनाची निर्मिती करणाऱ्या एका अमेरिकेतील कंपनीने कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना अधिकची चिरफाड न करता सुलभ झाली पाहिजे. याकरिता १७८८ फोर के कॅमेरा लॅप्रोस्कोपी सिस्टीम नावाचे अत्याधुनिक यंत्र तयार केले आहे. या अत्याधुनिकतंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती अडचण येते, त्या यंत्राची उपयोगिता ही सरळ आणि सोपी आहे का? याच्या परिक्षणासाठी डॉ. ठाकूर यांची निवड केली आहे, अशी माहिती डॉ. विशाल गुरव यांनी दिली. या नव्या तंत्रज्ञानामुळे पित्ताशयाची पिशवी काढणे, स्वादूपिंडाचे खडे काढणे, हर्निया, बेरॅटिक सर्जरी, हिस्टोरी, पोटातले वेगवेगळे विकार तपासणे आणि योग्य वेळेत शस्त्रक्रिया करणे याशिवाय छातीचे कॅन्सर, पोटातील विकार, आतड्याचे रोग आदींवर तत्काळ उपाय करणे सोपे जाणार आहे.
भारतातील पहिलाच प्रयोग
शस्त्रक्रियेचा भारतातील पहिलाच प्रयोग आम्ही सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून घेतला आहे. अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात, अशी माहिती अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी दिली. मुंबई, पुणे आणि हैद्राबाद येथील मोठ मोठ्याल्या रुग्णालयात ज्या पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते. त्याच पद्धतीची शस्त्रक्रिया सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.