सोलापूर : आसरा चौकातील मंत्री चंडक विहारमधील रहिवासी डॉ. प्रदीप गुणधर सवळे (वय 69, मूळ रा. बार्शी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन नातवंडे, दोन भाऊ, दोन बहिणी, भावजयी असा परिवार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली. तत्पूर्वी त्यांनी बार्शी, वैराग, मंद्रुप येथे आरोग्य अधिकारी म्हणून नंतर कोकणातही काम केले. निवृत्तीनंतर रायचूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.