सोलापुरातल्या प्रसिद्ध स्पर्श न्यूरो केअर हॉस्पिटलचे प्रमुख असणारे मेंदू विकार तज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) डॉ आनंद मुदकण्णा यांचे दुःखद निधन झाले. मागील काही वर्षांपासून कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. डॉ मुदकण्णा यांनी 2016 साली दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मेंदू विकारावर होणारा प्रचंड खर्च टाळता यावा यासाठी त्यांनी गरजू शेतकऱ्यांना मोफत उपचार देण्याचा उपक्रम राबविला होता. डॉ मुदकण्णा यांचे मुळगाव मुरूम असल्याने आज सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सोलापुरातील स्पर्श हॉस्पिटल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजता मुरूम येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.