महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची सभा झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
नियोजन कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदी उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, पायाभूत विकास कार्यक्रम अशा 25 योजनांचा आढावा घेण्यात आला.
डॉ. महास्वामी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण तसेच शहरी नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, यादृष्टीने प्रयत्न करा. रस्ते विकास, आरोग्य, भूमी अभिलेखांचे संगणकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि विमा योजनांवर विशेष भर देण्यात यावा.केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत काही समस्या असल्यास तत्काळ संपर्क साधावा. योजनांचे आराखडे करताना, अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जावे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांवर या योजनातून लवकरात लवकर तोडगा काढला जावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक शेत रस्ता केला जावा. घरकुल योजनांना प्राधान्य द्यावे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या.बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन जाधव, कार्यकारी अभियंता एस. एच. शेळके, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे आदी अधिकारी उपस्थित होते.