सोलापूर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आयोजित परिसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या परिसंवाद कार्यक्रमात "मी प्रथंम भारतीय आणि शेवटीही भारतीय" या विषयावर माझी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी व्याख्यान दिले व व्याख्यानामध्ये असे म्हणतात डाँ बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार” या विषयावर वालचंद महाविद्यालयातील डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी व्याख्यान दिले. महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मंदिर प्रवेशाची चळवळ ही सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि समान अधिकार प्राप्त करण्यासाठी होती तसेच
सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, ” आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा ” यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.
असे डॉ. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. चांगदेव कांबळे व बाबुराव संगेपाग यानी यांनी अध्यक्षीय भाषण केले.भाजप अनुसूचित आघाडी यांनी आयोजन केलेल्या कार्यक्रमा विषय सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख साहेब,भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचन यन्नम,शिवानंद पाटील,रुदरेश बोरामनी,शशी थोरात,इंदिरा कुडक्याल,चांगदेव कांबळे,बाबुराव संगेपांग,रोहिणी तडवळकर,नगरसेवक प्रा.नारायण बनसोडे,संजय कोळी,रवी कय्यावाले,वंदना गायकवाड,संगीत जाधव,राजेश्री चव्हाण,अनिल कंदलगी,प्रशांत फत्तेपुरकर, प्रवीण कांबळे, गौतम कसबे,राम तडवळकर,सागर मुगळे,शिंवानद वडतिले,आंनद गोडलेलु,दताञेय नडगिरी,सरफराज कांबळे,महेश बनसोडे, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकंबे सर यांनी केले,तर प्रास्ताविक आणि आभार नगरसेवक प्रा नारायण बनसोडे यांनी केले.