सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर दि.25 (जिमाका):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुत गिरणीच्या सर्व सभासदासाठी विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक. 04 मे 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर या ठिकाणी प्रशासक तथा वस्त्रोद्योगच्या प्रादेशिक उप आयुक्त श्रीमती उज्वला पळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
वस्त्रोद्योग आयुक्त यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ/कलम 78 अन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सह. सुत गिरणी, सोलापूर येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुत गिरणीच्या कामकाजासाठी 97 घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सुत गिरणीस आदर्श उपविधी स्विकारणे कायदेशीरदृष्टया बंधनकारक आहे. आदर्श उपविधी स्विकृतीनंतर सदर सुत गिरणीचे कामकाज करणे सोईचे होणार आहे.गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास, सदर सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेण्यात येईल. याची सर्व सभासदानी नोंद घ्यावी.
97 घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने आदर्श उपविधी स्विकारणे हा सभेपुढील विषय राहील अशी माहिती प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुत गिरणी लि सोलापूर. तथा वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपआयुक्त उज्वला पळसकर यांनी दिली आहे. तसेच सभेसाठी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.