तेलंगणाचे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांचे हस्ते पुणे येथे होणार वितरण.
सोलापूर वृत्तसंस्था: सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांना
भारतीय आयुर्वेद संस्था यांच्याकडून दिला जाणारा मानाचा “आयुर्वेद गौरव पुरस्कार ” जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार तेलंगणा राज्याचे महामहीम राज्यपाल श्री विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते उद्या दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सुमंत मुळगावकर ऑडिटोरियम, पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे .
डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर हे भारतातील इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर यांच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ” निमा” या संघटनेचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत . त्यांनी अनेक वर्षे निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ही कामकाज पाहिले आहे. या माध्यमातून त्यांनी आयुर्वेद डॉक्टरांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्या सोबत आयुर्वेद शास्त्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. "निमा" चे सोलापूरचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी , सचिव डॉ. अभिजीत पुजारी यांच्यासह सोलापुरातील डॉक्टरांनी डॉ.विनायक टेंभुर्णीकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.