देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर सोलापूर सहसचिव कृष्णा आसबे यांनी राबविला होता. यावेळी मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच झाडे लावण्यात आले आले. यावेळी गावातील रमेश पाटील, विठ्ठल वाघमारे, मरेप्पा साबळे, गोटूराम गायकवाड, दत्ता पाटील, तसेच शाळेतील मुख्याध्यापक व गावकऱ्यांचा सहभाग होता