सोलापूर,दि.6: कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत घरेलू कामगारांनी शासनाचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते क्रमांक आणि आधारकार्डाची माहिती http://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करून अद्ययावत करण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने कोविड19- प्रादुर्भाव काळात घरेलू कामगारांना 1500 रूपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र 2011 ते 2014 या कालावधीत झालेल्या कामगार नोंदणीत अनेकांनी बँक खाते क्रमांक आणि आधारकार्डाची साक्षांकित प्रत कामगार कार्यालयाला दिलेली नाही. 2015 ते 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या सर्व घरेलू कामगारांनी बँक खाते क्रमांक आणि आधारकार्ड लिंक करणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, कामगार कल्याण केंद्र, दमाणीनगर, सोलापूर, दूरध्वनी क्रमांक-0217-2728401, ईमेल [email protected] यावर संपर्क साधण्याचे आवाहन येलगुंडे यांनी केले आहे.