येस न्युज मराठी नेटवर्क ; आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने, भयानक आपत्ती म्हणजे करोनाची साथ आणी करोना आणी मधुमेह हृदरोग यावर योगा प्राणायामच्या मदतीने आपण सर्व करूयात मात.एक सांगावे वाटते की, नुसते सर्व days च्या दिवशी days साजरे करून नंतर गप्प राहण्यापेक्षा, रोजच प्रत्येक दिवस साजरा व्हावा, म्हणजे आसने व्यायाम ध्यान रोजच केले गेले पाहिजे.आणी फक्त स्थूल, रोगी यांनीच करावे, मी निरोगी आहे मला काही होत नहीं म्हणून व्यायाम न करने हेही चुकीचेच आहे.
सध्या तर स्त्रीरोग, बाल स्थूलता, युवा स्थूलता आणी मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर ने थैमान मांडले आहे असे काही नहीं की अनुवांशिकतेने आजार होतात तर आमच्यात कुणाला मधुमेह नहीं म्हणून आम्हाला होणार नहीं तर बैठी जिवनशैली आणी सर्वकाही online, यामुळे वरील आजार अगदी सर्वांनाच हमखास होणारच म्हणून हे फक्त योगा,प्राणायाम,आसने, व्यायाम चालणे, सायकलिंग यामुळे नक्कीच टळतील.
सर्वप्रथम रोग जनपदोध्वन्स रोग सध्या पसरत आहेत ते वायू, पाणी, देश आणी काल यासर्वात दोष निर्मिती मुळे पसरत आहेत त्यावर उपाय म्हणजे ऋतुनुसार आयुर्वेदिक पंचकर्म, चूर्ण, गोळ्या काढे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानुसार घेणे आणी योगासने, प्राणायाम तर करणेचजरुरी आहे.याच बरोबर ऍलोपॅथीक गोळ्या औषधे वेळ पडल्यास रुग्णालयात admit होणे गरजेचे असते पण हे सर्व व्यायाम,पथ्य,दिनचर्या ध्यान धारणा यामुळे नक्कीच टाळता येईलआणी सध्याचे जंकफूड, आणी विरुद्ध अन्न, जसे दूध आणी फळ यांचे शेक हेही टाळणे योग्यच होईलसाधा सकस आहार आणी भरपूर पाणी ताजे दूध, भरपूर व्यायाम,अतिगोड आणी अति तेलकट टाळणे हेही योग्यच होईलआणी प्राणायाम आणी आसने आपला पोटातील अग्नी चे योग्य कार्य घडवतात जसे अतिभूक अती तहान न लागता आपण मर्यादेत अन्न पाणी घेतो.
आता काही आसने जी विशिष्ट् रोगावर उपयुक्त त्यांची नावे सांगते जी योग तज्ज्ञ कडून माहित करून मग करावीतबैठी आसने -पदमासन,वज्रसन, मत्स्यसन, गोमूखसन -ही आसने तानतणाव, ऍसिडिटी,पोटदुखी , अंगदुखी, थकवा दूर करणारी आहेतपाठीवर झोपून करायची आसने हलासन, सर्वांगासन, नौकासन, शवासान.ही आसने पाठदुखी मणक्यातील गॅप, किडनीचे विकार, मानदुखी, कंबरदुखी दूर करतातं. पोटावर झोपून करायची आसने – मकरासन, भुजंगासन, धनुराशन, विपरीत नौकासन ही आसने पोटाचे सर्व विकार,स्त्रियांमध्ये गर्भाशायचे सर्व विकार, छाती, फुफुसांचे विकार,सर्व विकार दूर करतातं
तसेच उभे राहून करण्याचे वृक्षासन हे तर सायटीका नावाचा आजार, पायाचे सर्व व्याधी दूर करतातं
सध्या तानतणाव, कौटुंबिक कलहमुळे होणारे मानसिक आजार तर खूप बळावले आहेत त्यासाठी नुसते प्राणायाम, ध्यान,चंद्राच्या सानिध्यात, पाण्याच्या समुद्राच्या सानिध्यात करायची ध्यान धारणा असे खूप उपाय आधी होते तेच नवीन मानस उपचार नावाची झालर लावून निघालेत,
पण असे सांगावे वाटते की आपल्या कुटुंबासह एकत्र हसतखेळत व्यायाम करत स्वतः ची आणी सर्वांची व्याधी प्रतिकार क्षमता वाढवणे आणी आजार होऊच न देणे हे दीर्घायुष्याचा सर्वात छान मार्ग आहे
सध्या ग्रामीण भागात देखील जिल्हा परिषद,आरोग्य प्रशासनाने योग शिक्षक नेमले आहेत व ते रोज सगळ्या नागरिकांचे योगा, प्राणायाम, आसने घेतात जेणेकरून सर्व नागरिक निरोगी उत्साही राहतील.
डॉ. सारिका होमकर CHO होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर, सोलापूर