येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते.यावेळी धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. मात्र काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा, असं मी त्यांना सांगितलंय, आणि कितीही सरकार पडण्याचा प्रयत्न करा काहीही होणार अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.