वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेचा समारोप
सोलापूर : भाषा ही प्रवाही असते. जिवंत शब्द घेऊन ती वाहत असते. प्रत्येक मैलागणिक भाषा बदलत असते. त्या प्रत्येक भाषेत शब्दांचे वैवीध्य असते. त्या वैविध्यामुळे विनोद निर्मिती होते असे प्रतिपादन हास्य कवी नारायण पुरी (छ. संभाजीनगर) यांनी केले.
वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प ‘हास्य धारा’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.
यावेळी श्री पुरी यांनी ‘काटा’, प्रेमाचा जांगडगुत्ता, इष्क प्रितीची या कविता सादर करण्याबरोबरच कौटुंबिक, सामाजिक व राजकीय प्रसंगावर मार्मिक भाष्य केले.
याप्रसंगी अरविंद जोशी, महावीर दुरुगकर, दशरथ वडतिले, दत्ता थोरे, सोमेश्वर याबाजी, आनंद दुलंगे, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील, गौरीशंकर अतनुरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. विजयकुमार बिराजदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती सचिव अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, शिव कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, संगमेश्वर स्वामी, अमोल कोटगोंडे, यांनी परिश्रम घेतले.
वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेप्रसंगी अमोल शिंदे, दीपक आर्वे, महादेव कोगनुरे, सिद्धेश्वर मुनाळे, हास्य कवी नारायण पुरी, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार