सोलापूर : मोडनिंब येथे झालेल्या फेरफार अदालतीमध्ये जिल्ह्यातील खातेदारांच्या वारस नोंदी करण्याबाबत जिल्हा तलाठी संघाची बैठक पार पडली. मयंत खातेदार तसेच सर्व वारस नोंदी 1 ते 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हा तलाठी संघाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात शेतकरी बंधू -भगिनींनी तलाठी कार्यालयात वारस नोंदीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तलाठी यांच्याकडे जमा करावेत.