सोलापूर: येथील जिल्हा सत्र न्यायालय प्रवेशद्वार समोर भारतीय संविधानाची प्रास्ताविकेच्या शिलालेखाचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण व न्यायमुर्ती शिवकुमार ङिगे साहेब यांच्या हस्ते आज झाले. भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ जनजागृती व्हावी सदर कार्यालयात दररोज येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, युवक युवती महिला शासकीय व निमशासकीय कर्मचारी राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील लोकांना भारतीय संविधानाचे प्रास्ताविकास स्पष्टपणे दिसावी, भारतीय संविधानाचे महत्व कळावे या हेतूने हा शिलालेख बसवण्यात आला. जिल्हा सत्र न्यायालय प्रशासनाने प्रयास संस्थेच्या मागणीची दखल घेऊन हा शिलालेख उभारला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांसह प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी, महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन अॅड. मिलिंद थोबडे, प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे उपस्थित होते.