येस न्युज मराठी नेटवर्क । सोलापूर शहर व जिल्ह्यात म्युकरमायकोसिस चे रुग्ण वाढत असल्याने Amphotericin B 50 mg liposamal हे इंजेक्शन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वाटप करण्याबाबत आदेश काढला आहे. शासकीय रुग्णालयातून हे इंजेक्शन शहरातील २४ आणि पंढरपूर मधील दोन व अकलूजमधील एक अशा एकूण सत्तावीस हॉस्पिटल्सना मिळणार आहे. केळकर नर्सिंग होम आणि एनटी केअर सेंटरला सर्वाधिक ३० इंजेक्शनचा कोटा मिळाला आहे. स्पर्श हॉस्पिटलला एकोणीस , सी एन एस ला १० आणि अश्विनी रुग्णालयाला १२ इंजेक्शन्स मिळणार आहेत. ही इंजेक्शन्स प्रत्येकी ४,७९२ रुपयांना मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.