येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरमध्ये गेले ३ दिवस झाले काही शेतकरी उपोषण करत आहेत व तसेच चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशाने शहाजी पवार यांच्या निदर्शनास आले तेंव्हा त्यांनी ठरवले की जगाचा पोशिंदा म्हणारे मायबाप माता भगीनी रस्त्यावर उघड्यावर झोपत आहेत, तसेच सध्याच्या वातावरणात होणारा थंडीचा त्रास कमी व्हावा व त्यांना मायेची चादर द्यावी, त्यांना होणारा त्रास थोड्या प्रमाणात कमी करता आला तर आम्ही आमचे भाग्य समजतो हा उद्देश ठेवून आपल्या कार्यकर्त्यां मार्फत तेथील सर्व शेतकरी बंधु आणि भगिनीसाठी चादर व टाॅवेलची व्यवस्था करून दिली शेतक-यांसाठी राजकारण बाजूला ठेवून शक्य होईल तेवढी मदत करू आणि आपेक्षा व्यक्त केली की, शेतक-याचा जो काही प्रश्न आहे तो तात्काळ सोडवण्यात यावे. यावेळी संभाजी दडे, अझर शेख, योगेश गवळी, अमोल बोराडे व संपूर्ण टीम उपस्थित होती.