भवानी पेठेतील रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले.ते पुढे म्हणाले की, माता भगिनींमध्ये कोणतेही समस्येला सामोरे जाण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटलं जातं. राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवित आहेत. नवरात्र निमित्त नारीशक्तीचा सन्मान अशा पुरस्काराने करणे म्हणजे स्त्रियांमधील शक्ती रूपाला नमन करणे होईल असेही आ.देशमुख म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पूडूर,उद्योजक वेंकटेश चाटला,सुभाष जक्कापुरे, उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे, योगगुरु शेखर लक्ष्मेश्वर, बसव योग केंद्राच्या अध्यक्षा मीनाताई पंचाक्षरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी जीवन गौरव पुरस्कार काशीबाई रेवणसिद्ध ख्याडे, यांना, अध्यात्मिक सेवा पुरस्कार रूपाताई स्वामी, नागरी सेवा पुरस्कार पत्रकार सौ.अश्विनी तडवळकर,कै.चन्नप्पा गुळगी उद्योगरत्न पुरस्कार सुलोचना भाकरे,देव माणूस डॉ.मोहन तंबाके वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सौ.सोनाली घोंगडे,कै.मातोश्री शकुंतला खोबरे प्रेरणा पुरस्कार कु.पल्लवी बिंगी तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार शंकर लिंग महिला भजनी मंडळाला प्रदान करण्यात आला. शाल,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,बसव पदक आणि साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉक्टर सोनाली घोंगडे, पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक उज्वला शिवगुंडे यांनी सूत्रसंचालन श्रुती बोगा यांनी तर प्रज्ञा ख्याडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास बसव योग केंद्राचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.