अनुभव प्रतिष्ठान , सोलापूर (ट्रस्ट):
यांच्या वतीने हिंदूनववर्ष व गुढीपाडवा निमित्ताने आदि जांबमुनी शाळा मैदान जय मल्हार नगर, बाळे येथे गरजू गरीब आणि बेघर 90 मुलांना पुरणपोळी व पाणी बॉटल वाटप करण्यात आले आणि त्या मुलांना सोबत गुढीपाडवा देखील साजरा करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रमिला उबाळे मॅडम,वेंकीज इंडिया लिमिटेड चे HR मॅनेजर सुदर्शन पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक करकी,डॉक्टर सौ सौम्या नरोणे,सौ संगीता नागणसुरे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश कालदीप,संतोष शिवशिंपी,गणेश येळमेली, शिवानंद नागणसुरे, शिवानंद भाईकट्टी, महेश भाईकट्टी, चेतन बुऱ्हाणपूरे, प्रसाद कालदीप, सावनकुमार नरोणे,संगमेश्वर हलकट्टी,शंकर तालिकोटी,धनंजय ममदापुरे ,कार्तिक तालिकोटी,आदी युवकांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले.