सोलापूर : पार्क चौक येथील मिष्टी मिठाई व नमकीन यांच्यातर्फे “आजादी का अमृत महोत्सव” या उत्सवानिमित्त गरीब व अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. विविध व्हरायटीजचा आस्वाद या अनाथ मुलांना देऊन त्यांना मनसोक्त आनंद मिळविला. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो. यामुळे अनाथ मुलांना या आजादी के अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या पण मनासारखे काही तरी एक घास खुशीचा देण्याचा संकल्प आम्ही केल्याचे मिष्टी मिठाईचे हेमल शहा यांनी व्यक्त केला.