गेली दहा ते बारा वर्षापासून हा उपक्रम शालेय विद्यर्थ्यांकरिता यशस्वीरित्या राबवित आहेत
सोलापूर ; पुर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् च्या वतीने मागील दहा वर्षापासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते यंदाच्या वर्षीही ते करण्यात आले.
दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वेदब्राह्मण यांच्याकडून वह्यांचे पूजन करण्यात आले.
पूर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् मध्ये सोलापुरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. काही दाते देणगीदार म्हणून पुढे येतात आणि अशा गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करता यावे म्हणून देणगी देतात. असे सचिव व्यंकटेश्वर चिलका यांनी सांगितले.
शैक्षणिक साहित्यात वही, पेन्सिल, पट्टी, शॉपनर अशा वस्तूंचा समावेश आहे. जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी, पालक, व्यापारी, देणगीदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.