सोलापूर:
सालाबादप्रमाणे भ.महावीर जन्मकल्याणक निमित्ताने ह्या ही वर्षी दिगंबर जैन जागरण युवा संघाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
सध्या उन्हाळा तीव्र असल्याने पक्ष्यांचा जीवदयेच्या विचार करून संस्थेच्या माध्यमातून आज Bird Water Feeder चे वाटप करण्यात आले.
तसेच जैन समाजातील एका होतकरू गरजू कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली
या प्रसंगी जैन जागरणचे शिरीष चंकेश्वरा,मनीष शहा, सुनील शहा,निलेश शहा,अमीचंद मेहता, अमित पालिया,मनोज शहा, कमलेश शहा, धनंजय शहा,प्रशांत कोठाडीया, प्रशांत मेहता,श्रेयांश पंडित, रिदांश नागदा,वैशाली शहा,कामिनी गांधी,सौ यशश्री शहा, सौ दर्शना शहा यांचे सहकार्य लाभले.