सोलापूर लोकमंगल फाउंडेशन संचलित लोटस योजनेअंतर्गत गरीब, गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून एकूण 18 विद्यार्थ्यांना 3 लाख 30 हजार 250 रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहरातील व्यापारी विशाल बंसल व पुण्याचे लोटस अंतर्गत लाभ घेतलेले डॉ. बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे संचालक जयवंत थोरात, मारुती तोडकर, उपस्थित होते. या वेळी लोटस योजनेतील कमिटी मेंबर मोरे, डॉ.प्रवीण ननवरे, डॉ. सुधीर ननवरे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.लोकमंगल फाउंडेशन संचलित लोटस योजनेची सुरुवात 2015 पासून सुरुवातझाली. आजपर्यंत एकूण जवळपास 200 विद्यार्थ्यांना एकूण 77 लाख 41 हजार 82 रुपयांची शैक्षणिक मदत करण्यात आली आहे.