सोलापूर : सोलापूर येथील आनंदश्राममध्ये स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटनेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संघटनेचे संस्थापक दिपक काबंळे, राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख धनश्री उत्पात, राष्ट्रीय सहसचिव श्वेता व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. काकासाहेब कुलकर्णी (प्रदेश प्रवक्ते कॉग्रेस आय), हनुमंत मोतीबाणे हे होते. तर प्रस्तावना सोनाली पोतदार यांनी केले. सुत्रसंचालन मेहरकर, बुरडे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचां सत्कार करण्यात आला. त्यानंतर आदर्श शिक्षकांचा कुलकर्णी व हनुमंत मोतीबाणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र , ट्रॉफी आणि तुलशीचे रोप देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी धनश्री उत्पात, उमेश काशीकर, श्वेताताई व्हनमाने, श्रीराम बडवे, विवेक कुंभेजकर, रविंद्र गोयल, स्मिता ढगे, रश्मी बोराडे, वंदना बुरडे, प्रेमलता वैद्य, प्रियाराणी मेहकर, वंदना उपलप, श्रध्दा अध्यापक, प्रफुल्ल हिटनळी, गौरव खंदारे, विलास अरळी, सोमेश साखरे, सुमित व्हटकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोलापूर शहर कार्यकारिणी ने अथक परिश्रम घेतले.