जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरि उमरगे येथे विषय शिक्षिका या पदावर कार्यरत असणाऱ्या आदर्श व नवोपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर (धस ) यांचा मुलगा चिरंजीव आर्यन नवनाथ धस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसानिमित्त गेली अकरा वर्षापासून विविध शैक्षणिक व शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करतात .जसे शालेय दप्तर वह्या पेन पेपर पॅड पाटी उजळणी पुस्तक पेन्सिल पट्टीचे किट वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून स्वतःच्या मुलाचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून आनंद वाटण्याची परंपरा गेली अकरा वर्षापासून राबवतात हा त्यांचा अभिनव उपक्रम चालू आहे .
याच प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरी उमरगे येथे शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शालेय दप्तराचे वाटप व खाऊचे वाटप त्यांनी केले .ज्या ज्या ठिकाणी त्या कार्यरत असतात त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्यांचा हा अभिनव उपक्रम राबवतात यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या राबवत असतात . जसे वृक्ष लागवड ‘ माझीलेक माझा स्वाभिमान , बालविवाह प्रतिबंध , मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण यासह विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम त्या राबवितात .
या कार्यक्रमाची सुरुवात परिपाठासह महाराष्ट्र गीत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत सी . वी . रमन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
उपस्थित सर्व मान्यवरांचा शॉल पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका रिंकू जाधवर (धस) यांनी केले याप्रसंगी त्या म्हणाल्या गेल्या अकरा वर्षापासून मी हा उपक्रम घेत असून पुढेही हा उपक्रम अविरतपणे चालू राहील शैक्षणिक तळमळीतून या उपक्रमाची सुरुवात केल्याचे त्यांनी म्हटले ही मदतीची साखळी अशीच पुढे माझे विद्यार्थी ही चालवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष जिरगे सर यांनी केले तसेच याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उषाताई पुजारी उपाध्यक्ष . अश्विनीताई अस्वले . श्रीशैल पाटील . गोरखनाथ पाटील .चंद्रकांत वागदरी .देवानंद अस्वले . चंद्रकांत अस्वले . कृष्णा पाटील .संतोष बिराजदार . लक्ष्मीकांत कोळी अजय साखरे उपसरपंच . अंबिकाताई कोळी . राजकुमार वाघमारे .यांच्यासह रामपूर गावचे सरपंच इरण्णा बिराजदार प्राध्यापक परमेश्वर आरबळे सर मैंदर्गी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हडलगी सर . महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष शाखा अक्कलकोट कमलाकर सोनकांबळे . पत्रकार राजू जगताप .पत्रकार विश्वनाथ चव्हाण . जाकीर तांबोळी तसेच शाळेतील शिक्षक सौ संध्या बशेट्टी , श्री बालाजी हादवे तसेच गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री मल्लिकार्जुन सोमेश्वर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन श्री नवनाथ धस यांनी केले .
तसेच आर्यनला उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थितांकडून व पालकांकडून जाधवर – धस कुटुंबाच्या या अभिनव उपक्रमाच्या परंपरेचे कौतुक करण्यात येत आहे .