सोलापूर : शहरात स्मार्ट सिटी कंपनीने बोगस आणि निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे नागरिकांचा संताप दररोजच आहे. याबाबत नगरसेवक काहीच बोलत नाही मात्र शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मनपा सभेत काँग्रेसचे माजी महापौर आणि नगरसेवक यूएन बेरिया यांनी स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करा अशीच मागणी केली त्यामुळे सर्व जण अवाक झाले. साडेचारशे कोटी रुपये खर्चून स्मार्ट सिटी च्या माध्यमातून उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्यात येत असून याचे गेल्या बारा महिन्यात केवळ 12 टक्के काम झाले आहे पाणीपुरवठा च्या कामाची बेरिया चिरफाड केली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी बरखास्त करता येते का असा सवाल नगरसेवक गुरु शांत दुत्तर गावकर यांनी उपस्थित केला तर मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी कामाची चौकशी करू मात्र कंपनी बरखास्त करता येते का याची मला माहिती नाही असे उत्तर दिले ही चर्चा रंगली असताना अचानकच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी यांनी मक्तेदार पोचमपाड या कंपनीने वाढीव पैशाची मागणी केल्याचा मुद्दा उपस्थित केला बेरिया यांनी एग्रीमेंट मध्ये वाढीव प्राइसेस क्लेशन तरतूद नसताना तुम्ही कशी मागणी करता असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर धनशेट्टी गप्प बसले