नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील सद्यस्थिती, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा व शहर कार्यकारणीची पुनर्बांधणी करणे इ. विविध विषयांवर चर्चा केली. या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे सहकार सेलचे कार्याध्यक्ष व जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे यांनी केले.
याप्रसंगी प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, भारत बेदरे, भारत पाटील, शिवगोंडा पाटील, संजय घोडके, प्रमोद भोसले, शिव स्वामी, हणमंत पवार, दिगंबर सुडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक आघाडीचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी,विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.