येस न्युज मराठी नेटवर्क । चासकमान धरणातून दि.४ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १.०० वा. चासकमान धरणाच्या सांडव्यावरून ९२५ क्यूसेक्स वरून १२९५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच विद्युत गृहातून ८५० क्यूसेक्स निसर्ग सुरू असून त्यापैकी ५५० क्युसेक्स कालव्यातून चालू आहे व ३०० क्युसेक्स कि. मी. ०/८१० मधील अतिवाहक मधून नदीत सोडण्यात आले आहे. भीमा नदीत एकुण ३००+१२९५=१५९५ क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.