सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता बचत गटामधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्टेट बँकेने कर्ज पुरवठा करण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.
हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा विक्री केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयं सहाय्यता समुह बँक कर्ज प्रकरण वाटप मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.याप्रसंगी स्टेट बॕंक मुंबईचे महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव , जिल्हा अभियान संचालक तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे , कोल्हापूर विभागाचे विभाग स्टेट बँंकेचे विभागीय व्यवस्थापक धीरज हिरे , राज्य अभियान व्यवस्थापक नितीन हर्चेकर , सोलापूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक रणधीर कुमार,मुख्य व्यवस्थापक सुभाष उकरंडे, व रवींद्र शिंदे , उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी, आर्थिक समावेशनचे जिल्हा अभियान व्यवस्थापक भगवान कोरे यांच्यासह सांगोला, उत्तर सोलापूर, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढे या तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन, व स्वयं सहाय्य समूहातील सुमारे ८०० महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी स्टेट बँक मुंबईचे महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव यांनी , जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी कर्ज वितरणाचे मेळाव्याचे आयोजित करुन जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करणार असल्याचे सांगितले.जिल्हा अभियान संचालक तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे म्हणाले , सदर बँकेच्या मेळाव्यात जिल्ह्यामध्ये बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना केवळ सामाजिक योगदान म्हणून न पाहता बिझनेस मॉडेल म्हणून पाहण्याची गरज आहे.यावेळी विभागीय व्यवस्थापक धीरज हिरे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी स्टेट बँकेमार्फत माढा, सांगोला, करमाळा, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व मंगळवेढे या तालुक्यातील १३१ समूहांना १ कोटी ५० लाख रुपये इतके कर्ज वितरण करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूरच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी , विजय पाटील , भगवान कोरे , सोमनाथ माने, दिनेश सरवदे , रविंद्र भोसले , पोपट चौधरी , गजानन सुतार , अवधूत देशमुख , पूनम दुध्याळ , धनंजय व्हनमाने , विकास नाळे , चंद्रशेखर दिघे यांच्यासह स्टेट बँकेची टिम ,जिल्हा व तालुका अभियान कक्ष आदींनी परिश्रम घेतले.