सोलापूर : श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थेच्या 13 संचालकांची पुढील पाच वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. श्री सोमवंशीय क्षत्रिय समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवप्रकाश चव्हाण, सहस्त्रार्जुन विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष गणपतसा मीरजकर यांनी निवडून आलेल्या बिनविरोध संचालकांचा सत्कार केला. निवडले गेलेले संचालक पुढीलप्रमाणे नरसिंग मेंगजी, किशोर बसुते, नारायण काटवे, मनोहर लोमटे, किरण रंगरेज, संजीव रंगरेज, प्रशांत हबीब, संजीव बिद्री, मोनाली रंगरेज, सुनील बुरबुरे, लिंगप्पा वाकीठोळ, नरेंद्र भोसले यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे