डॉ गिरीश ओक यांच्या “तो कुणी माझ्यातला” या पुस्तकाचे थाटात प्रकाशन व प्रकट मुलाखत
सोलापूर -प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात शनिवारी, ०७ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेते डॉ गिरीश ओक यांच्या “तो कुणी माझ्यातला’ या पुस्तकाचे डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन कार्यक्रमास जेष्ठ चित्रकार रविमुकुल, अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी व या पुस्तकांचे शब्दांकन ज्यांनी केले ते लेखक शिरीष देखणे उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अभिनेते डॉ गिरीश ओक यांची शिरीष देखणे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कार्यक्रमामध्ये
पुस्तकाचे मुखपृष्ठकार चित्रकार रविमुकुल ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, शब्दांवरील प्रेमामुळे या क्षेत्रात आलो. मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाशी मुक्त केलेला संवाद आहे.
डॉ सुहासिनी शहा या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी बोलताना म्हणाल्या कि, प्रिसिजन वाचन अभियानात होत आहे हे प्रिसिजन आणि सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाचन संस्कृती खूप कमी झाली आहे या वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वाचन अभियान सुरू केला आहे.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर अभिनेते डॉ गिरीश ओक यांची प्रकट मुलाखत लेखक शिरीष देखणे यांनी घेतली. “तो कुणी माझ्यातला” या पुस्तकाविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि लेखक, प्रकाशक आणि मुखपृष्ठकार यांच्या आग्रहामुळे हे पुस्तक प्रत्यक्षात आले. या मुलाखती दरम्यान डॉ ओक यांनी आपला सर्व नाट्य प्रवास उलघडला. नागपूर महाविद्यालयातुन नाट्य प्रवासाची सुरवात झाली. कॉलेजच्या गॅदरिंगमुळे या क्षेत्रात आलो.
अभिनयाची चटक म्हणजे भिकेचे डोहाळे होते. चालू असलेले दोन दवाखाने व गर्भ श्रीमंतीतील घर सोडून मुंबईत आल्यावर घर, जेवण, पैसे आणि स्वतःची किम्मत समजली. सुरवातीच्या काळात पैसे खर्च करायला नव्हते आणि पैसे खर्च करायला वेळ नाही. आयुष्याच्या सुरवातीला केलेला स्ट्रगल आठवून आता मजा येते कारण स्ट्रगल मधून मिळालेले यश हे स्वर्गसुख देतो.
पुढे बोलताना डॉ ओक यांनी सांगितले कि, डॉ काशिनाथ घाणेकर यांच्या सोबतच घडलेला किस्सा सांगितला. डॉ काशिनाथ घाणेकर हे हाऊसफुलकिंग होते.
नाटकच्या आधी वाजवलेली घंटा ही नाटक सुरु होण्याचे इंडिकेशन आहे. घंटानाद ऐकला कि अंगात ऊर्जा निर्माण होते व नाट्य प्रवेश होतो. दिपस्तंभ नाटकाबद्दलचा ही त्यांनी एक किस्सा सांगितला कि नाटकात एका महिलेला आगीमध्ये ढकललं म्हणून मावशीने भेटण्यास नकार दिला होता.पुढे बोलताना ते म्हणाले कि दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि माझ्या अस्थिर जीवनाला स्थिरता आली अशी कृतज्ञता ही त्यांनी व्यक्त केली.
मुलाखतीमध्ये पुढे डॉ ओकांनी आकाशमिठी या नाटकात साकारलेल्या छ. शिवाजी महाराजांची भूमिकाबद्दल सांगितले तसेच या नाटकातील अफजल खान भेटीच्या आधीच संवाद वाचून दाखविला. हा संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले.
या मुलाखती दरम्यान डॉ गिरीश ओक यांनी अभिनय केल्याला नाटकांच्या व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आल्या व कार्यक्रमाच्या शेवटी “तो मी नव्हेच” या नाटकातील लाखोबा लोखंडे याचा शेवटचा सिन सादर करून रसिक प्रेक्षकांना खळखळून हसविले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माधव देशपांडे यांनी व्यक्त केले.