सोलापूर – माजी आमदार दिलीपराव माने यांच्या 3 ऑगस्ट रोजी होणाया वाढदिवसाच्या निमित्ताने गौरव समितीचे वतीने 16 जुलै पाककला स्पर्धा, 22 जुलै चित्रकला स्पर्धा, 23 जुलै विडी वळणे स्पर्धा, तर 30 जुलै रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, खेळाडू, नागरीक व महिलांनी सहभागी होण्याचे आवहान गौरव समितीचे वतीने करीत आहोत.
◼️रविवार दि. 16/07/2023 रोजी दुपारी 3.00 वा. पाककला स्पर्धा
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रविवार दि. 16/07/2023 रोजी दुपारी 3.00 वा. गोविंदश्री मंगल कार्यालय, जुळे सोलापूर. येथील सभागृहात ‘मास्टर शेफ कूकींग’ पाककला स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत पनीर, बटाटा, रवा यापैकी एका वस्तुचा वापर करून गोड या तिखट रेसीपी करावयाची आहे. प्रथम विजेते क्रमांकासाठी दहा हजार रुपये, व्दितीय सात हजार रुपये, तृतीय पाच हजार तर उत्तेजनार्थ एक हजाराची दहा बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय सहभागी स्पर्धकांना गिफ्ट दिले जाणार आहे. महिला स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी 8805883178/ 8888802741/ 7840954030 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवहान संयोजिका आश्लेषा वांगीकर, ताई बनसोडे, श्रध्दा जोशी यांनी केले आहे.
◼️शनिवार दि. 22/07/2023 रोजी सकाळी 8.00 वा. रंगभरण व चित्रकला स्पर्धा
शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीचा रंगभरण व चित्रकला विषयक असून त्यांचे आनंदासाठी व कलागुणासाठी शनिवार 22 जुलैे रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा 1. न्यु हायस्कूल सलगरवाडी. 2. निर्मलाताई ठोकळ प्रशाला, आदित्य नगर समोर. 3. जागृती विद्यामंदिर, नेह डिग्री नगर. 4. ज्ञानप्रबोधन विद्यालय, माशाळ वस्ती. 5. भारती विद्यापीठ, जुळे सोलापूर. 6. किल्लेदार मंगल कार्यालय, आसरा चौक. 7. कुमठे प्रशाला, कुमठे. 8. एन.एफ. शहा कोठारी हायस्कुल, कुमठा नाका. 9. धर्मण्णा सादुल प्रशाला, निलम नगर. 10. नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कुल, निलम नगर. 11. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला, तिहे. या 11 परिक्षा केंद्रासह विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे 5 उपकेंद्रे देखील करण्यात आली असून या केंद्रावर स्पर्धा घेतली जाणार आहे. यामध्ये किमान 20 हजार विद्यार्थी सहभागी होण्याचे अंदाज आहे. शिशु गट, पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी व सहावी, सातवी व आठवी, नववी व दहावी अश्या सहा गटात ही स्पर्धा होणार असून केंद्र निहाय चार रोख बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे. शाळानिहाय नाव नोंदणी सु डिग्री असून अधिक माहितीसाठी 9421043208 संपर्क करावा असे आवहान संयोजक शांतप्पा काळे यांनी केले आहे.
◼️रविवार दि. 23 जुलै 2023 सकाळी 11.00 वा. विडी वळणे स्पर्धा
सोलापूर शहरात विडी महिला कामगार मोठ्या प्रमाणात असून कुटूंबीय आर्थिक मदतीसाठी विडी वळण्याचा व्यवसाय करतात. त्यांची विडी करण्याची लखप चलाखी कौतूकास्पद आहे. त्यांच्या कलागुणांचे कौतूक करण्यासाठी, त्यांचे व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी विडी वळणे स्पर्धा रविवार दि. 23 जुलै 2023 रोजी स.11.00 वा. श्री. नवदुर्गा देवस्थान भाग-2 निलम नगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी एक तासाचा वेळ असून स्पर्धकांनी विडी करण्यासाठी लागणारे साहित्य पान, कात्री, तंबाखू, दोरा आणावयाचे आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रुपये पाच, व्दितीय चार, तृतीय तीन हजार तर उत्तेजनार्थ एक हजार प्रमाणे 10 बक्षीसे देण्यात येणार आहेत. तरी विडी कामगार महिलांनी या अभिनव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7499214678/ 7620497447/ 8007740470 या नंबरवर संपर्क साधून नांव नोंदणी करण्याचे आवहान गौरव समितीचे वतीने करीत आहोत.
◼️रविवार दि. 30 जुलै 2023 रोजी सकाळी 7.00 वा. मॅरेथॉन स्पर्धा
गौरव समितीच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थीनी व खुला गटासाठी रविवार दि. 30 जुलै 2023 रोजी सकाळी 7.00 वा. केएलई स्कूल, जूळे सोलापूर येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेले असून ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे.
●14 वर्षे मुले-मुली (3कि.मी.) :- केएलई प्रशाला – हॉटेल दावत – शिवदारे कॉलेज – कुमठेकर हॉस्पीटल – पाणी टाकी – डि मार्ट हा मार्ग असेल.
●17 वर्षे मुले-मुली (5कि.मी.) :- केएलई प्रशाला – हॉटेल दावत – भारती विद्यापीठ – इंचगेरी मठ टाकळीकर मंगल कार्यालय – कुमठेकर हॉस्पीटल – पाणी टाकी -डि मार्ट. हा मार्ग असेल.
● खुला गट पुरूष व महिला (10कि.मी.) :- केएलई प्रशाला – हॉटेल दावत – भारती विद्यापीठ – इंचगेरी मठ – सैफुल – ब्रह्मदेवदादा माने बँक – एसआरपी कॅम्प युर्टन – अत्तार नगर – कुमठेकर हॉस्पीटल – पाणी टाकी -डि मार्ट. हा मार्ग असेल.
यास्पर्धेत सर्व गटासाठी प्रथम क्रमांकास 11, व्दितीय 7, तृतीय 5 व उत्तेजनार्थ 2 हजार या प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आली आहेत. तरी या स्पर्धेत सोलापूर शहर, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व खुला गटातील पुरूष व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9881982100, 9767471920 या क्रमांकाशी संपर्क साधवा असे आवहान गौरव समितीचे वतीने करीत आहोत.
आमचे मार्गदर्शक दिलीपराव माने हे सहकार, बँकींग, साखर कारखानदारी, शैक्षणीक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत असले तरी क्रिडा क्षेत्रात त्यांचे योगदान सर्वाधिक आहेत. विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आजवर क्रिकेट, चॉकबॉल, कब्बडी, मोटारकार उलटी चालवणे आदि स्पर्धेचे सतत आयोजन करीत असून त्यांचे वैचारीक मार्गदर्शनानुसार त्यांचे वाढदिवसानिमित्त पाककला (मास्टर शेफ कूकिंग), रंगभरण व चित्रकला, विडी वळणे, मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असून सोलापूर शहर, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालूक्यातील विद्यार्थी, खेळाडू, महिलांनी सहभागी व्हावे व आपण देखील या स्पर्धेचे वार्ताकनसाठी उपस्थित रहावे असे आवहान करीत आहोत.
पत्रकार परिषदेस प्रकाश काशीद, संजय घोडके (मॅरेथॉन), आश्लेषा वांगीकर (पाककला), मंजूश्री भोसले, रंजना क्षिरसागर (विडी वळणे), शांतप्पा काळे (चित्रकला), सुनिल जाधव अध्यक्ष, उमेश भगत समन्वयक मा.पृथ्वीराज माने युवा मंच हे उपस्थित होते.