येस न्युज मराठी नेटवर्क : नाशिक विभागाचा अत्यंत मानाचा पुरस्कार -गिरणा पुरस्कार आताच जाहीर झाले आहेत. मागील 23 वर्षापासून विविध क्षेत्रातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गिरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गिरणा हा पुरस्कार दर वर्षी 14 जानेवारी रोजी जाहीर होतात व 5 एप्रिल ला प्रदान केले जातात. या वर्षीचा तो पुरस्कार आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक कर्तव्यदक्ष प्रशासक दिलीप स्वामी (IAS) मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.सोलापूर यांना देखील मिळाला आहे.दिलीप स्वामी यांनी मागील तीन वर्ष नाशिक जिल्ह्यात आपली प्रशासकीय सेवा बजावली आहे.या काळात मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी असताना महसूल, शिक्षण,शेती,निवडणूक या अनेक विभागात उल्लेखनीय तथा प्रशंसनीय लोकाभिमुख कार्य केले.तसेच लोकअदालत,प्रशासन आपल्या दारी अनेक दुर्लक्षित वाडी वस्त्या मध्ये जाऊन शासनाच्या वतीने जाग्यावर अनेक प्रमाणपत्राचे तथा सिधा पत्रिकेचे वाटप ,स्वच्छतेचे महत्त्व सांगत लोकसहभागातून सुंदर स्वच्छ निर्मल मालेगाव उपक्रमातून मालेगाव शहराचा कायापालट केला आहे.तसेच नाशिक येथे विभागीय उपायुक्त महसूल या पदावर अनेक महत्वपूर्ण कार्य केले.विद्यार्थी मार्गदर्शन,शेतकरी मार्गदर्शन,सुंदर स्वच्छ कार्यालय,महसूल विभागातील अनेक महत्वाचे निर्णय जे लोकहिताचे होते सर्वसामान्यांचे रेंगाळलेली कामे मार्गी लावत नाशिक विभागात कौतुकास्पद कार्य केले आहे.
पदोन्नती नंतर आज सोलापूर जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असताना सोलापूर जिल्हा परिषद आपली कात टाकत आहे. स्वामी साहेबांच्या मार्गदर्शनातून या विभागाचा कायापालट होताना दिसून येत आहे.