मुंबई : दीक्षाभूमीला “अ वर्ग” तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू आणि दीक्षाभूमीच्या विकासाचा 190 कोटी रुपयांचा नवा आराखडा लवकरच मंजूर करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमी ला “ब वर्ग” तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. चाळीस कोटी रुपये ऍडव्हान्स म्हणूनही दिले होते. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात 40 कोटी रुपये बँक खात्यामध्येच राहून गेले. त्यापैकी दमडीचा ही वापर विकास कामांसाठी होऊ शकला नाही अशी खंत फडणवीस यांनी बोलून दाखवली.